दोन वर्षांपूर्वी मोनिका मोरे रेल्वेतून पडून तिचे दोन्ही हात गमावल्याची घटना आपल्या लक्षात असेलच. मोनिका मोरे ला नंतर कृत्रिम हात बसवण्यात आले होते. परंतु मोनिकाला त्या हातांनी कामं करणे अवघड जात आहे. त्या मोनिकासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. तिला आता आयुष्यभर कृत्रिम हातांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. लवकरच तिच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करून तिला नवीन हात लावण्यात येणार आहेत. मुंबईतच नव्हे तर हि महाराष्ट्रातील पहिलीच हस्तप्रत्यारोपण शस्त्रक्रिया असेल. मोनिकाचे परावलंबी जीवन कमी करण्यासाठी हाताचे प्रत्यारोपण करण्याचा वैद्यकीय
उपाय मोरे कुटुंबीयांनी स्वीकारला आहे. मोनिकाची परीक्षा सुरु असल्याने परीक्षा संपल्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. मेंदू मृतावस्थेत असलेल्या व्यक्तीचेच हात मोनिकाला प्रत्यारोपित करण्यात येतील
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews